2 May 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

PTC India Share Price | या कंपनी खरेदीच्या घोडदौडमध्ये अदानी आणि टाटा ग्रुप, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, डिटेल्स पहा

PTC India Share Price

PTC India Share Price | मागील दोन दिवसांपासून पीटीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागत आहे. शेअर बाजारात एका चर्चेला उधाण आले आहे की, अदानी ग्रुप, टाटा पॉवर व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्या ‘पीटीसी इंडिया’ कंपनीचे भाग भांडवल खरेदी करण्यास इच्छुक आहेत. या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्समध्ये 4.95 टक्के वाढीसह 100.65 रुपयांवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 105.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)

पीटीसी इंडियाचे संपूर्ण प्रकरण :
‘पीटीसी इंडिया’ कंपनीमधे एनटीपीसी, एनएचपीसी, पॉवर फायनान्स कॉर्प आणि पॉवर ग्रिड कॉर्प ऑफ इंडिया या दिग्गज कंपन्यांकडे प्रत्येकी 4-4 टक्के भाग भांडवल आहे. सध्या शेअर बाजारात अशी चर्चा सुरू आहे की, या सर्व कंपन्या आपले स्टेक अदानी ग्रुप आणि टाटा ग्रुपला विकू शकतात. पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी अदानी समूह, टाटा पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी आणि ग्रीनको या कंपन्या 16 भाग भांडवल खरेदी करण्यास स्वारस्य दाखवत आहेत.

या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी ‘पीटीसी इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्प काही दिवसांनी सादर होणार आहे. पण त्याआधी पीटीसी इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या नवीन वर्षात PTC इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 114.90 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 67.50 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PTC India Share Price 532524 Focus check details on 19 January 2023.

हॅशटॅग्स

#PTC India Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x