14 May 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Persistent Systems Share Price | दिग्गज कंपनीचा जबरदस्त शेअर! 442% परतावा प्लस डिव्हीडंड जाहीर, स्टॉक बद्दल जाणून घ्या

Persistent Systems Share Price

Persistent Systems Share Price | तिसऱ्या तिमाहीचा कालावधी पूर्ण झाला आहे, आणि अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. या त्रैमासिक निकालासोबतच अनेक कंपन्यांनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश देण्याचीही घोषणा केली आहे. भारतातील दिग्गज IT कंपनी ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ देखील त्यापैकी एक आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा करून सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 28 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्हाला लाभांश लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर स्टॉक खरेदी करावे लागतील कारण लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट याच आठवड्यात आहे. ही कंपनी T+2 सेटलमेंट श्रेणीमध्ये येत असल्याने त्याची एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट वेगवेगळी असेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Persistent Systems Share Price | Persistent Systems Stock Price | BSE 533179 | NSE Persistent)

पर्सिस्टंट सिस्टम्स लाभांश रेकॉर्ड डेट :
‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ या कंपनीने शेअर बाजार नियामक सेबी कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना 28 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या लाभांश वाटपासाठी कंपनीने 27 जानेवारी 2023 रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे कंपनी 25 जानेवारी 2023 रोजी एक्स-डिव्हिडंडवर ट्रेड करेल. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शेअर बाजाराला सुट्टी असेल.

कंपनीची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ कंपनीचे शेअर 1.24 टक्क्यांच्या वाढीसह 4,311 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के वाढीसह 4380.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुझी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून स्टॉक होल्ड केला असता तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 18 टक्क्यांहून अधिक वाढले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4,954 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 3092.05 रुपये आहे. पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीचे बाजार भांडवल 33,044.26 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Persistent Systems Share Price 533179 stock market live on 23 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x