5 May 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा
x

Vodafone Idea Share Price | 'व्होडाफोन आयडिया' कंपनीच्या शेअरमध्ये 1 दिवसात 23% वाढ, स्टॉक वाढीचे कारण काय?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मागील बऱ्याच काळापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करणाऱ्या ‘VI टेलिकॉम’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रॉकेटच्या गतीने वर जात होते. काल स्टॉकमध्ये जबरदस्त होत होती, तर आज मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीचे शेअर्स 4.24 टक्के घसरणीसह 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीच्या शेअर्सने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 24 टक्केची जबरदस्त उसळी घेतली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)

सरकारच्या एका सकारात्मक निर्णयानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी केंद्र सरकारने कर्जबाजारी ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीच्या 16,133 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी आली. भारत सरकारला प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स कंपनीतर्फे जारी केले जातील. आज मात्र स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीचे स्पष्टीकरण :
व्होडाफोन आयडियाने शेअर बाजार नियामक सेबीला कळवले की, टेलिकॉम मंत्रालयाने 3 फेब्रुवारी 2023 रोजी स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते पुढे ढकलण्याशी संबंधित व्याज आणि AGR देय रक्कम इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला, ज्यात भारत सरकारला शेअर्स जारी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. भारत सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर केलेल्या सुधारणा पॅकेज अंतर्गत या टेलिकॉम कंपनीला खूप मोठा दिलासा दिला आहे.

Vodafone Idea कंपनीने माहिती दिली आहे की, एकूण 16,133 कोटी रुपये थकीत व्याज रकमेपोटी इक्विटी शेअर्स भारत सरकारला जारी करायचे आहेत. कंपनीला प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 1613,31,84,899 इक्विटी शेअर भारत सरकारला जारी करावे लागतील. स्टॉकची इश्यू किंमत देखील 10 रुपये आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने माहिती दिली आहे की, व्याज थकबाकीचे इक्विटीमध्ये रूपांतर केल्यास भारत सरकारला कंपनीचे 35 टक्के भाग भांडवल मिळतील.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती :
मागील काही वर्षांपासून VI कंपनीचे शेअर्स सातत्याने पडत होते. मागील एका वर्षात ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीचे शेअर्स 24 टक्के झाली आले होते. तर मागील पाच वर्षात शेअरची किंमत 83.48 टक्के घसरली आहे. या वर्षी YTD आधारे स्टॉकची किंमत 5 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 7 टक्के वर गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price 532822 stock market live on 07 February 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x