10 May 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

DCX Systems Share Price | नुकताच सूचीबद्ध झालेला हा स्टॉक कमालीची कामगिरी करतोय, शेअर खरेदी करणार?

DCX Systems Share Price

DCX Systems Share Price | शेअर बाजारात कमालीची अस्थिरता असताना काही शेअरमध्ये मजबूत उसळी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. तर आज मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.14 टक्के घसरणीसह 166.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. काल हा स्टॉक जवळजवळ 15 टक्के वाढीसह 174.15 रुपये किमतीवर पोहोचला होता, मात्र आज स्टॉकमध्ये किंचित पडझड पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत ‘डीसीएक्स सिस्टीम’ कंपनीचे शेअर्स 36.19 टक्के कमजोर झाले आहेत. तर वार्षिक आधारावर या स्टॉकमध्ये 24 टक्के पडझड झाली आहे. त्याच मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये 19.69 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | DCX Systems Share Price | DCX Systems Stock Price | BSE 543650 | NSE DCXINDIA)

कंपनीबद्दल माहिती :
‘डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड’ या कंपनीचा IPO नोव्हेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात दाखल झाला होता. ‘डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड’ कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि कंपनीने IPO ची इश्यू किंमत 197-207 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली होती. 11 नोव्हेंबर 2022 रोजी हा स्टॉक शेअर बाजारात 40 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत बीएसई निर्देशांकावर 319.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचली होती.

15 फेब्रुवारी 2023 रोजी ‘डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड’ कंपनीचा स्टॉक 149.65 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचला होता. आता स्टॉकमध्ये खालच्या पातळीवरून रिकव्हरी पाहायला मिळत आहे. नुकताच डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा सेल्स 14.68 टक्के घसरून 355.95 कोटीवर आला आहे. तर डीसीएक्स सिस्टीम्स कंपनीचा निव्वळ नफा 5.05 टक्के घटला असून 17.29 कोटी रुपयेवर आला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 18.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. नुकताच DCX सिस्टम्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक निफ्टीच्या सिक्युरिटी निर्देशांकात सामील झाला आहे. डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी इलेक्ट्रॉनिक अप प्रणाली आणि केबल हार्नेस यांचे उत्पादन करणाऱ्या अग्रगण्य उत्पादकांपैकी मंकिंजाते. कंपनीच्या अनेक ग्राहकांचे नाव Fortune 500 कंपन्यांच्या यादीत देखील सामील आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DCX Systems Share Price 543650 DCXINDIA stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

#DCX Systems Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x