29 April 2024 4:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

पालघरमधून महाआघाडीची बळीराम जाधव यांना उमेदवारी

Loksabha Election 2019, Palghar, Baliram Jadhav, Hitendra Thakur

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, एनसीपी, बहुजन विकास आघाडी या महाआघाडीतर्फे माजी खासदार बळीराम जाधव यांनी काल मोठं शक्तिप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडे उमेदवार नसल्याने त्यांनी आयत्यावेळी भाजपचे राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून तिकीट देत पालघरच्या मैदानात उतरवले आहे.

महाआघाडीतर्फे काल बलाढ्य स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखला केला. त्यातच महाआघाडी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.’बविआ’मधील उमेदवारीचा घोळ अखेर शेवटच्या दिवशी मिटला. अर्ज भरताना पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा व वसई तालुक्यांतून तब्बल १० ते १५ हजार कार्यकर्ते व ४०० पेक्षा अधिक वाहने मिरवणुकीत सहभागी झाली होती.

पालघरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच सोमवार, २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. माजी खासदार बळीराम जाधव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बहुजन विकास आघाडीकडून तिघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. परंतु, अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत बहुजन विकास आघाडीकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

विशेष म्हणजे, ज्या ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हावर बविआ निवडणूक लढवत आली आहे, तेही पक्षाच्या हातून निसटले. शिट्टी, रिक्षा आणि अंगठीपैकी एका निवडणूक चिन्हाची निवड केली जाणार आहे. पालघर पंचायत समितीजवळून मिरवणुकीला सुरुवात करून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. बेंजो, तारपा नृत्य, आदिवासी नृत्य करत ही मिरवणूक काढण्यात आली.

पालघरमधून शिवसेनेच्या तिकिटावर राजेंद्र गावित निवडणूक लढवणार आहेत. गेल्यावेळी पालघरमधील पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या गावित यांनी यावेळी उमेदवारीसाठी शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसेनेत गावित यांना प्रवेश दिल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी नाराज असून, गावित यांनी ज्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यादिवशी भाजप व सेना कार्यकर्त्यांनी अनुपस्थित राहून नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्ये मतदानासाठी अवघे १९ दिवस शिल्लक राहिले असले, तरी ही नाराजी दूर करण्यात या दोन्ही पक्षांना अद्यापही यश आले नाही. त्यामुळे महाघाडीच्या उमेदवारास त्याचा मोठा फायदा होईल, असे बोलले जात आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x