12 May 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर चीनच्या दुप्पट, आकडा १३६ कोटींवर

India, China, Population

नवी दिल्ली : भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, २०१० ते २०१९ या दहा वर्षाच्या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२०१९ मध्ये भारताची लोकसंख्या १३६ कोटींवर पोहोचली आहे. तत्पूर्वी १९९४ मध्ये ती ९४.२२ कोटी इतकी होती. तसेच १९६९ मध्ये ती ५४.१५ कोटी इतकी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी इतकी झाली आहे. मागील वर्षी ही आकडेवारी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१० आणि २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येत १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी इतकी होती. संबंधित अहवालानुसार, भारतात १९६९ मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के इतका होता. तो १९९४ मध्ये ३.७ टक्के राहिला. परंतु, भारताने जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.

१९६९ मध्ये जन्माबरोबरच सरासरी आयुर्मान हे ४७ वर्ष होते. १९९४ मध्ये साठ वर्ष झाले त्यानंतर २०१९ मध्ये ते ६९ वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी दर ७२ वर्ष आहे. अहवालात २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची २७-२७ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे ० ते १४ आणि १०-२४ वर्ष इतके आहे. तर देशाची ६७ टक्के लोकसंख्या १५-६४ या वयोगटातील आहे.

देशाची सहा ६ टक्के लोकसंख्या ६५ वर्ष वयाची आणि त्यापेक्षा अधिक वयाची आहे. भारताच्या आरोग्य सुविधा प्रणालीच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. देशात माता मृत्यूदर १९९४ मध्ये एक लाखांमागे ४८८ इतका होता. त्यात घट होऊन २०१५ मध्ये हा दर प्रती लाख १७४ मृत्यू इतपर्यंत खाली आला. मात्र, युएनएफपीएचे संचालक जेनेवा मोनिका फेरो यांनी ही आकडेवारी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. हा दर आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करताना महिलांचे मृत्यू थांबवण्यासाठी गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवांमध्ये वाढ होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x