6 May 2024 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Visaka Industries Share Price | ही कंपनी लवकरच गुंतवणुकदारांना डिव्हीडंड वाटप करणार, जाहीर केली रेकॉर्ड तारीख

Visaka Industries Share Price

Visaka Industries Share Price | ज्या लोकांनी ‘विसाका इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ‘विसाका इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘विसाका इंडस्ट्रीज’ कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 अंतिम लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. मागील तीन वर्षांत ‘विसाका इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. चल तर मग जाणून घेऊ या स्टॉकचे पूर्ण तपशील. (Visaka Industries Limited)

लाभांश रेकॉर्ड तारीख :
सेबीला दिलेल्या माहितीत ‘विसाका इंडस्ट्रीज’ कंपनीने सांगितले आहे की, कंपनीने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 शेअरवर 7 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 70 टक्के लाभांश देणार आहे. या लाभांशासाठी कंपनीने 12 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच 12 एप्रिल 2023 रोजी पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील कंपनी फक्त त्यांनाच लाभांश देणार आहे.

‘विसाका इंडस्ट्रीज’ कंपनीची कामगिरी :
सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.54 टक्के वाढीसह 354.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विसाका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर NSE इंडेक्सवर 1.35 टक्के वाढीसह 342 रुपयांवर क्लोज झाले होते. विसाका इंडस्ट्रीज कंपनीने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. ‘विसाका इंडस्ट्रीज’ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी मागील वर्ष फारसे चांगले नव्हते. मागील एका वर्षात विसाका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 42.55 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Visaka Industries Share Price on 03 April 2023.

हॅशटॅग्स

Visaka Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x