6 May 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

Apollo Pipes Share Price | 5 रुपयाच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले, दिला 11000 टक्के परतावा, शेअरची कामगिरी पाहा

Apollo Pipes Share Price

Apollo Pipes Share Price | ‘अपोलो पाईप्स’ या पाइप निर्माता कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 11 हजार टक्के परतावा कमावला आहे. 2013 साली ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटींहून अधिक झाले आहे. चला जाणून घेऊ ‘अपोलो पाईप्स’ कंपनीच्या शेअरची कामगिरी. (Apollo Pipes Limited)

‘अपोलो पाईप्स’ शेअरची कामगिरी :
2013 साली ‘अपोलो पाईप्स’ कंपनीचे शेअर्स 4.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून हा स्टॉक अनेक पटींनी वाढून 540 रुपये किमतीवर पोहोचला आहे. आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी ‘अपोलो पाईप्स’ कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के घसरणीसह 539.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी दहा वर्षापूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 1.11 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.

‘अपोलो पाईप्स’ ही एक स्मॉलकॅप कंपनी असून तिचे एकूण बाजार भांडवल 2,148 कोटी रुपये आहे. ही कंपनी पाईप सिस्टीमचे उत्पादन आणि वितरण करण्याचे काम करते. कंपनी पाईप फिटिंग्ज, स्प्रिंकलर सिस्टम आणि सॉल्व्हेंट सिमेंट देखील बनवण्याचे काम करते. या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला समजेल की, कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे एकूण 52.03 टक्के भाग भांडवल आहे. त्याच वेळी, उर्वरित 47.33 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे आहे.

सार्वजनिक गुंतवणुकदारांपैकी म्युच्युअल फंडने कंपनीचे 11.23 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूकदारांनी देखील कंपनीचे दोन टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्यात किरकोळ गुंतवणूकदारांनी 26 टक्के भाग भांडवल गुंतवले आहे. मागील काही तिमाहीपासून ‘अपोलो पाईप्स’ कंपनीच्या सेल्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. 2012-13 या आर्थिक वर्षात कंपनीने 68 लाख रुपयेची सेल्स केली होती. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीने एकूण 784 कोटी रुपयेची सेल्स केली होती. त्याच वेळी कंपनीचा निव्वळ नफा देखील या कालावधीत 36 लाख रुपयांवरून वाढून 50 कोटी रुपयेवर पोहचला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Pipes Share Price on 03 April 2023.

हॅशटॅग्स

Apollo Pipes Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x