15 May 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Indian Bank Share Price Today | बँक FD 3 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा या सरकारी बँकेचा शेअर 1 महिन्यात देतोय, खरेदी करणार?

Indian Bank Share Price

Indian Bank Share Price Today | आज शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळाली. आयटी स्टॉक तिमाही निकालाच्या प्रेशरमुळे पूर्णपणे घसरले होते, तर PSU बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत धावत होते. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये PSU बँक इंडेक्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. या तेजीमध्ये, ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने ‘इंडियन बँक’ या सरकारी मालकीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (Indian Bank Limited)

‘इंडियन बँक’ चे शेअर्स पुढील दोन आठवड्यांत मजबूत परतावा कमावून देऊ शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी इंडियन बँकेचे शेअर्स 8.48 टक्के वाढीसह 311.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंडियन बँक स्टॉक टार्गेट प्राईस :
इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 312 रुपये होती. तर आणि 52 आठवड्यांचा नीचांक पातळी किंमत 137 रुपये होती. इंडियन बँकेचे एकूण बाजार भांडवल 36,200 कोटी रुपये आहे. तज्ञांनी इंडियन बँकेचे शेअर 300-305 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तेजीचा कल असेल तर 350 रुपये लक्ष किंमत निश्चित करण्यात आली आहे आणि मंदीचा कल असेल तर रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 290 रुपयेवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील एका महिन्यात इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 90.58 टक्के परतावा कमवून दिला आहे. तर YTD आधारे हा स्टॉक 5.29 टक्के वाढला आहे.

सध्या जगात अमेरिका आणि चीन मध्ये बँकावर आर्थिक संकट घोंगावत असताना आणि जगात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत असताना भारतीय बँका जबरदस्त कामगिरी करत आहेत. जगातील अनेक देशामध्ये आर्थिक मंदीची सुरुवात झाली आहे, मात्र भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय बँकिंग सिस्टीम अजूनही खूप मजबूत असल्याने आर्थिक मंदीचे कोणतेही संकेत भारतात दिसत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Bank Share Price Today on 17 April 2023.

हॅशटॅग्स

#Indian Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x