16 May 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

ION Exchange Share Price Today | मजबूत परतावा देणारा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत दहा पट स्वस्त होणार, रेकॉर्ड तारीख पहा

ION Exchange Share Price

ION Exchange Share Price Today | ‘आयओएन एक्सचेंज’ या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत धावत होते. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के घसरणीसह 3,326.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. काल या स्टॉकमध्ये इतकी तेजी कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केल्यावर पाहायला मिळाली होती. (ION Exchange Limited)

कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाचा बैठकीत 1 : 10 या प्रमाणात शेअर विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स कंपनी 10 भागामध्ये विभाजित करणार आहे. म्हणजेच कंपनी एका शेअरचे 10 तुकडे करणार आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
कंपनीने शेअरची भांडवल बाजारातील तरलता वाढवण्यासाठी आणि छोट्या गुंतवणूकदारांना शेअर्स अधिक परवडणारे बनवण्यासाठी शेअरचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट अद्याप निश्चित केलेली नाही. स्टॉक स्प्लिट केल्यावर शेअरची किंमत स्टॉक स्प्लिट प्रमाणानुसार कमी होते. म्हणजेच या कंपनीचे शेअर 10 पट स्वस्त होणार आहे.

शेअरची कामगिरी :
मागील एका आठवड्यात ‘आयओएन एक्सचेंज’ कंपनीच्या शेअरची किंमत 3.40 टक्क्यांनी वधारली होती. YOY आधारावर या स्मॉल कॅप कंपनीचे स्टॉक 23.34 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात ‘आयओएन एक्सचेंज’ कंपनीच्या शेअरने 88.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 81.02 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ION Exchange Share Price Today on 21 April 2023.

हॅशटॅग्स

ION Exchange Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x