6 May 2024 4:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Achyut Healthcare Share Price Today | दणादण पैसा देतोय हा शेअर, 6 महिन्यांत 278 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?

Achyut Healthcare Share Price

Achyut Healthcare Share Price Today | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यासोबत कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करतात. नुकताच ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ या कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. (Achyut Healthcare Limited)

या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 25 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला होता. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 49.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

29 मार्च 2023 रोजी ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीने सेबीला माहिती दिली होती की, कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक दोन शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. 25 एप्रिल 2023 हा दिवस कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. म्हणजे ज्या गुंतवणूकदाराचे रेकॉर्ड तारीख पर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील त्यांना कंपनी मोफत बोनस इश्यूचा लाभ देणार आहे.

जोरदार परतावा :
‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 179.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 278 टक्के वाढले आहेत. ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 85.65 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 15 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Achyut Healthcare Share Price Today on 26 April 2023.

हॅशटॅग्स

Achyut Healthcare Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x