12 May 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार?
x

IndiaMART InterMESH Share Price Today | या शेअरने 355% परतावा दिल्यानंतर आता डिव्हीडंड आणि फ्री बोनस शेअर्सची देण्याची कंपनीची तयारी

IndiaMART InterMESH Share Price

IndiaMART InterMESH Share Price Today | ‘इंडियामार्ट इंटरमेश’ ही ई-कॉमर्स कंपनी आपल्या भागधारकांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे. ‘इंडियामार्ट इंटरमेश’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 28 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक या बैठकीत बोनस शेअर्सच्या प्रस्तावावर चर्चा करू शकतात.

IndiaMART InterMESH Limited Stock Price Today on NSE & BSE 

जर संचालक मंडळाने बोनस शेअर्सची घोषणा केली की, गुंतवणुकदारांना मजबूत फायदा होऊ शकतो. गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 5,247.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुंतवणुकदारांना मजबूत फायदा :
28 एप्रिल 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मार्च 2023 तिमाहीच्या निकालांसह लाभांश आणि बोनस शेअर्स वाटप करण्यावर चर्चा होऊ शकते. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्या आपल्या स्टॉकची तरलता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना शेअरची किंमत परवडणारी वाटण्यासाठी बोनस शेअर वाटप करत असतात. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत इंडियामार्ट कंपनीने 251 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 61 टक्के वाढीसह 113 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 355 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 ऑगस्ट 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 1151.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियामार्ट इंटरमेश कंपनीचे शेअर्स 26 एप्रिल 2023 रोजी पर्यंत 5283.10 रुपयेवर पोहचले आहेत. इंडियामार्ट इंटरमेश कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5563.65 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 3676.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IndiaMART InterMESH Share Price Today on 27 April 2023.

हॅशटॅग्स

IndiaMART InterMESH Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x