29 April 2024 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

हनुमान चालीसा पठणाचा राजकीय स्टंट भोवला, 'शनिदेव कोपल्याने' भाजपसह राणा दाम्पत्याचा सुपडा साफ, प्रभू रामाचा आशीर्वाद काँग्रेसला

Amravati Bajar Samiti NIvadnuk

Amravati Bajar Samiti NIvadnuk | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून आला. त्यानंतरही अनेक घडामोडी घडल्या आहेत. या दरम्यानच्या काळात अनेकांना मंत्रिपदाची स्वप्न पडली. याशिवाय राज्यात आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले जात आहेत. अर्थात हे संकेत कितपत खरे ठरतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच.

पण सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या राजकीय घाडमोडींवर नेमकं काय आहे हे समजण्यासाठी एक महत्त्वाची निवडणूक पार पडलीय. ही निवडणूक म्हणजे राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूक.

देशात लोकसभेची निवडणूक आणि राज्यात विधासभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन पोहोचली आहे. पण त्या निवडणुकांआधी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल आज समोर आलाय. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसलाय. यातील अनेक दिग्गज मंत्री ते आमदार हे शिंदे गटातील असून त्यांना या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे समर्थकांचं काय होणार याचे संकेत मिळाले आहे.

मातोश्री’वर हनुमान चालीसा पठणाचा निव्वळ राजकीय स्टंट
उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह केल्याने राणा दाम्पत्याला 14 दिवस तुरुंगाची हवा खावी लागली होती, तर उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार पडल्यावर राणा दाम्पत्य देवाच्या नावानेच टिपण्या करताना वारंवार ‘राजकीय शिव्या-श्राप’ देण्यासाठी माध्यमांवर यायचे. त्याच राणा दाम्पत्यावर हनुमान चालीसा पठणाचा निव्वळ राजकीय स्टंट केल्याने ‘शनिदेव कोपल्याच्या’ टिपण्या नेटिझन्स समाज माध्यमांवर करत आहेत.

राणा दाम्पत्याला अमरावतीमध्ये एकही जागा नाही
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी एकहाती सत्ता राखली आहे. रवी राणा यांचा भाऊ सुद्धा इथं पराभूत झाला आहे. रवी राणांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही.

रवी राणा यांचे बंधू देखील पराभूत
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणी पूर्ण झाली आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये रवी राणा हे संपूर्ण ताकदीनिशी उतरले होते. मात्र रवी राणा यांना त्यांचे मोठे बंधू सुनील राणा यांना देखील निवडून आणता आले नाही. पराभवाचा मोठा धक्का आमदार रवी राणाआणि त्यांच्या सोबत असलेल्या भाजपाला बसलेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Amravati Bajar Samiti NIvadnuk MP Navneet Rana and MLA Ravi Rana loss Election check details on 29 April 2023.

हॅशटॅग्स

#Amravati Bajar Samiti NIvadnuk(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x