29 April 2024 4:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

भाजप नेत्यांनी समर्थन दिलेल्या समीर वानखेडेंवर CBI ने भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करताच वानखेडेंनी देशभक्तीचा राग आळवला

Former NCP Officer Sameer Wankhede

Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप असलेले एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे म्हणाले की, मला ‘देशभक्त’ म्हणून शिक्षा दिली जात आहे. वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. 2021 मध्ये वानखेडे तेव्हा प्रकाशझोतात आले जेव्हा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मुंबईतील क्रूझ जहाजावरून अटक करण्यात आली होती.

मात्र ती अटक मुळात स्क्रिप्टेड असल्याचा तेव्हापासून दाट संशय होता. हाय प्रोफाइल व्यक्तींना अडकवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातं असल्याचा आरोप त्यावेळीच विरोधकांनी केला. तोच आरोप दोन दिवसांपूर्वी सिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील एखाद्या निपुण राजकारण्याप्रमाणे समीर वानखेडे यांनी स्वतःच्या बचावासाठी धर्म, जातं आणि राष्ट्रभक्तीचा कांगावा स्वतःच्या बचावासाठी केल्याचं सर्वश्रुत आहे. तोच प्रत्यय पुन्हा येऊ लागला आहे अशी चर्चा पुन्हा सुरु होऊ शकते असं दिसतंय.

दरम्यान, या प्रकरणात आर्यन खानला वाचवण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप वानखडे यांच्यावर आहे. त्यांच्याकडून ५० लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयने वानखेडे यांच्या घरावर १२ तास छापे टाकले होते. याशिवाय सीबीआयने त्याच्या वडिलांच्या घरावरही छापा टाकला होता.

सीबीआयने तीन सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १२ मे रोजी सीबीआयने समीर वानखेडेंच्या घरासह २९ ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर समीर वानखेडे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. येथे रेव्ह पार्टी सुरू होती. येथूनच आर्यन खानसह इतर अनेकांना अटक करण्यात आली. मात्र न्यायालयात ड्रग किंवा ड्रगचं सेवन असं काहीच निष्पन्न झालं नव्हतं. तेव्हापासून समीर वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात होते. विशेष म्हणजे एक सरकारी अधिकारी असूनही त्यांची जीवनशैली अत्यंत शाही आणि महागड्या वस्तू वापरण्याची होती हे देखील अनेकदा सामोरं आलं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former NCP Officer Sameer Wankhede on CBI Radar for corruption check details on 14 May 2023.

हॅशटॅग्स

#Sameer Wankhede(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x