15 May 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Tata Group Shares | टाटा ग्रुपमधील हे 4 शेअर्स लोकांना मालामाल करणार, संपूर्ण डिटेल्स जाणून फायदा घ्या

Tata Group Shares|

Tata Group Shares | शेअर बाजारात टाटा ग्रुपच्या कंपन्यांचा बोलबाला आहे. टाटा ग्रुपचे शेअर्स आपल्या शेअर धारकांना विविध लाभ देत असतात. आज या लेखात आपण टाटा समूहाच्या 4 कंपन्याबाबत माहिती घेणार आहोत, पुढील काळात लाभांश वाटप करणार आहेत. शुक्रवारी या कंपन्यांनी आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. टाटा ग्रुपमधील या चार कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे लावून तुम्ही फायदा कमवू शकता.

1) टाटा कॉफी :
सेबीला दिलेल्या माहितीनुसार, टाटा कॉफी कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 300 टक्के लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 3 रुपये लाभांश देणार आहे. लाभांश वाटपासाठी 15 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के घसरणीसह 226.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2) टाटा पॉवर :
टाटा पॉवर कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय 19 जून 2023 रोजी होणाऱ्या 104 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे. मागील एका महिन्यात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरहोल्डर्सनी 5.48 टक्के परतावा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 208.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

3) टाटा मोटर्स :
टाटा मोटर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 2 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने आपल्या A दर्जाच्या ऑर्डीनरी शेअरवर 2.10 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के वाढीसह 532.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

4) टाटा स्टील :
टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति शेअर 3.60 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लाभांश वाटप करण्यावर अंतिम निर्णय जुलै 2023 मध्ये घेतला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

टाटा स्टील कंपनीची स्थिती फारशी चांगली नाही. मागील एका महिन्यात टाटा स्टील कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना किंचित प्रमाणात नकारात्मक परतावा दिला आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 107.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | List of Tata Group Shares price on 15 May 2023.

हॅशटॅग्स

Tata Group Shares price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x