15 May 2024 8:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

RVNL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 279 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदी करणार का?

RVNL Share Price

RVNL Share Price | नुकताच नवरत्न कंपनीचा दर्जा मिळालेल्या ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 279.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. या सरकारी कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांनी एका वर्षात भरघोस नफा कमावला आहे.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, भारत सरकारने देशातील पायाभूत सुविधाचा विकास करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 122.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मागील एका वर्षभरात विविध कामाचे ऑर्डर मिळाले आहेत. 2022-23 या एका वर्षभरात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे कंपनीला मिळालेले ऑर्डर्स देखील आहेत. या मोठ्या ऑर्डरमध्ये कंपनीला मुंबई मेट्रो लाईन आणि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे बांधकाम आणि देखभाल संबंधित काम देखील मिळाले आहे.

मार्च 2023 मध्ये, रभारतीय रेल्वेने 120 वंदे भारत रेल्वे गाड्यांचे उत्पादन आणि देखभाल करण्याचे काम रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दिले आहे. ही कंपनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात सेमी हायस्पीड ट्रेन उत्पादन करण्याचा कारखाना उभारणार आहे. भारतीय रेल्वेने या प्रकल्पाचे मूल्य 24,000 कोटी रुपये निश्चित केले होते.

एक वर्षभरापूर्वी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 31 रुपये किमतीवर ट्रेड करत होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर 118 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 86 टक्के परतावा कामवून दिला आहे.

मात्र 9 मे ते 12 मे 2023 या कालावधीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात घसरत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 144.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 29 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 17 May 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x