6 May 2024 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
x

Hindustan Aeronautics Share Price | 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स' कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत, 3 वर्षात 500 टक्के परतावा दिला

Hindustan Aeronautics Share Price

Hindustan Aeronautics Share Price | ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या डिफेन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर्स 500 रुपयांवरून वाढून 3000 रुपयांवर पोहचले आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत लोकांना 511 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Hindustan Aeronautics Share Price Today)

या कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3168 रुपये होती. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1629 रुपये होती. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 3,071.90 रुपये किमतीवर (Hindustan Aeronautics Share Price NSE) क्लोज झाले होते.

8 मे 2020 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 501.35 रुपये किमतीवर ट्रेड होते. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एक लाखावर 6 लाखाहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 19 मे 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3069.65 रुपये किंमत पातळीवर (Hindustan Aeronautics Share Price BSE) ट्रेड करत होते. जर तुम्ही 8 मे 2020 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.12 लाख रुपये झाले असते.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदार आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी संरक्षण कंपनीत मागील 4 तिमाहीत गुंतवणूक वाढवली आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीत विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा 9.07 टक्के होता. मागील वर्षीच्या याच कालावधीत परकीय गुंतवणूकदारांचा वाटा 4.37 टक्के होता.

भारतातील अनेक मोठ्या म्युच्युअल फंड हाऊसनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. डिसेंबर 2021 तिमाहीच्या शेवटपर्यंत हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीमध्ये म्युच्युअल फंडांचा वाटा 6.05 टक्के होता, जो मार्च 2023 तिमाहीच्या शेवटी 8.84 टक्केवर पोहचला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञ हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे मजबूत ऑर्डर बुक आणि महसूल वाढीची शक्यता विचारात घेऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hindustan Aeronautics Share Price today on 20 May 2023.

हॅशटॅग्स

#Hindustan Aeronautics Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x