10 May 2024 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Wipro Shares Buyback | विप्रो शेअर्स बायबॅकची घोषणा, गुंतवणुकदारांना होणार मजबूत फायदा, रेकॉर्ड तारीख सेव्ह करून ठेवा

Highlights:

  • Wipro Shares Buyback
  • विप्रो शेअरची सध्याची किंमत
  • बायबॅक योजना तपशील
  • 4 कोटी शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव
  • तिमाहीत 3,074.5 कोटी रुपये नफा कमावला
Wipro Share Buyback

Wipro Shares Buyback | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीने आपल्या शेअरधारकांना 12,000 कोटी रुपये मूल्याची शेअर बायबॅक ऑफर केली आहे. विप्रो कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. विप्रो कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीने बायबॅकसाठी पात्र आणि इक्विटी शेअर धारकांची नावे निश्चित करण्याच्या उद्देशाने 16 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.

विप्रो शेअरची सध्याची किंमत

आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 401.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बायबॅक योजना तपशील

विप्रो कंपनी संचालक मंडळाने 26.96 कोटी इक्विटी शेअर्सचे बायबॅक करण्यासाठी 445 रुपये प्रति शेअर ही किंमत निश्चित केली आहे. या अंतर्गत, विप्रो कंपनी एकूण 26,96,62,921 शेअर्स खरेदी करणार आहे. हे प्रमाण विप्रो कंपनीच्या एकूण पेड अप इक्विटी शेअर्सच्या 4.91 टक्के आहे. दरम्यान सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली होती. सध्या विप्रो कंपनीचे शेअर्स बायबॅक किमतीच्या 9 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत.

4 कोटी शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव

बायबॅक योजनेमध्ये 15 टक्के म्हणजेच 4 कोटी शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. SBI सिक्युरिटीज फर्मच्या मते विप्रो कंपनीच्या शेअर बायबॅकद्वारे किरकोळ गुंतवणूकदार 4 टक्के ते 13 टक्के परतावा मिळवू शकतात. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या मते गुंतवणुकदार या बायबॅकमधून 40 टक्के नफा कमवू शकतात.

तिमाहीत 3,074.5 कोटी रुपये नफा कमावला

आयटी कंपनी विप्रोने नुकत्याच संपलेल्या मार्च 2023 तिमाहीत 3,074.5 कोटी रुपये नफा कमावला आहे. यामुळे मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 3,087.3 कोटी रुपये नफा कमावला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचा नफा 7.1 टक्क्यांच्या घसरणीसह 11,350 कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्याच वेळी कंपनीने मागील आर्थिक वर्षात 90,487.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तलनेत मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या महसुलात 144 टक्के वाढ झाली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wipro Shares Buyback News today on 06 June 2023.

हॅशटॅग्स

Wipro Share Buyback(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x