5 May 2024 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Infollion Research Services IPO | बापरे! इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेसचा IPO लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के परतावा देणार?

Highlights:

  • Infollion Research Services IPO
  • IPO 259 पट सबस्क्राइब झाला
  • शेअर्सची ग्रे मार्केट कामगिरी
  • शेअर्स 167 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात?
  • IPO तपशील
Infollion Research Services IPO

Infollion Research Services IPO | इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि त्याची मुदत 31 मे 2023 रोजी संपली होती. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीच्या IPO ला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

IPO 259 पट सबस्क्राइब झाला

इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचा IPO एकूण 259 पट सबस्क्राइब झाला होता. ग्रे मार्केटमध्ये इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. शेअर मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

शेअर्सची ग्रे मार्केट कामगिरी

ग्रे मार्केटमध्ये इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 85 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. इन्फ्लेशन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80-82 रुपये निश्चित केली आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सचा प्रीमियम 85 रुपयांपर्यंत वाढले होते.

शेअर्स 167 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात?

जर इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 82 रुपये अप्पर बँडवर वाटप करण्यात आले, आणि 85 रुपये ग्रे मार्केट प्रीमियम किंमत टिकुन राहिली तर या कंपनीचे शेअर्स 167 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच पहिल्याच दिवशी इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 103 टक्के पेक्षा जास्त परतावा देऊ शकतात.

IPO तपशील

इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचा IPO 259 पट सबस्क्राइब झाला होता. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 264.10 पट सबस्क्राइब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 422 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा देखील 70.72 पट सबस्क्राइब झाला आहे. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनी IPO आपल्या IPO च्या माध्यमातून 21.45 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 8 जून 2023 रोजी सूचीबद्ध होणार आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Infollion Research Services IPO GMP Today details on 07 June 2023.

हॅशटॅग्स

Infollion Research Services IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x