19 May 2024 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

BJP Political Crisis | तामिळनाडूपासून हरयाणापर्यंत भाजपचे राजकीय संबंध धोक्यात, मित्रपक्ष नाराज, काय आहेत कारणे

BJP Political Crisis

BJP Political Crisis | लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आता तामिळनाडूतही भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) नाराज असल्याचे वृत्त आहे. मात्र, केंद्रातील सत्ताधारी पक्षातील मित्रपक्षांची नाराजी हरियाणा आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्येही कायम आहे हे देखील स्पष्ट होतंय. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून कवायत तीव्र केली जात असताना आणि विरोधक ऐक्याच्या गप्पा मारत असताना या राजकीय घडामोडी घडत आहेत.

२०२४ पर्यंत आपला वापर करून नंतर भाजप आपल्याला संपवेल अशी भीती या मित्र पक्षांना आहे. मोदी स्वतःचा राजकीय स्वार्थासाठी मित्र पक्षांना जवळ करतात आणि स्वार्थ पूर्ण झाल्यावर मित्र पक्षांमध्ये पुढच्या निवडणुकीपर्यंत ढुंकूनही पाहत नाहीत असा अनुभव या उरलेल्या मित्र पक्षांचा झाला आहे.

तामिळनाडूत अण्णाद्रमुक नाराज

तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी राज्यातील यापूर्वीच्या अनेक सरकारांना भ्रष्ट म्हटले होते. त्यांना १९९१ ते १९९६ या कालावधीबद्दल विचारण्यात आले. विशेष म्हणजे त्या काळात दिवंगत जयललिता सरकारमध्ये होत्या. आता पुन्हा या मुद्द्यावरून भाजप आणि अण्णाद्रमुकमध्ये नाराजी वाढत आहे. माजी मंत्री डी. जयकुमार यांनी नाराजी व्यक्त करत दिल्लीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक-भाजप युतीला एकही जागा मिळू नये आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, हा अण्णामलाईंचा हेतू आहे का? त्यांच्या कारवाया या दिशेने चालत नाहीत का? अन्नामलाई यांचे वक्तव्य अस्वीकार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हरियाणात जेजेपी नाराज आहे का?

हरयाणात जननायक जनता पक्षासोबत भाजपची सत्ता असून दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री आहेत. आता भाजपचे प्रदेश प्रभारी बिप्लबकुमार देब यांनी अपक्ष आमदारांसोबत घेतलेल्या भेटीमुळे राजकीय पारा चढला आहे. तर उचाना मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे चौटाला यांचा या जागेवर प्रभाव असून ते येथून निवडणूक लढवू शकतात.

पैलवानांच्या आंदोलनामुळे दोन्ही पक्षांमधील अंतरही वाढल्याचे बोलले जात आहे. मात्र, चौटाला आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर या दोघांनीही मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच पैलवानांचा आंदोलनाचा आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यामुळे भाजप येथे पराभवाच्या छायेत आहे असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत. त्यामुळे हरयाणातील भाजपचे मित्र पक्ष भाजपपासून लांब राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

News Title : BJP Political Crisis NDA alliance before Loksabha Election 2023.

हॅशटॅग्स

#BJP Political Crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x