10 May 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार
x

Data Patterns Share Price | अल्पावधीत 200 टक्के परतावा देणारा डेटा पॅटर्न इंडिया शेअर पुन्हा तेजीत, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार?

Data Patterns Share Price

Data Patterns Share Price | डेटा पॅटर्न इंडिया या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. डेटा पॅटर्न इंडिया कंपनीचे शेअर्स 2250 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहेत. डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्सचा लॉकइन कालावधी डिसेंबर 2022 रोजी संपणार होता.

परंतु नंतर त्यात वाढ करून हा कालावधी जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे गुंतवणूकदारांना अधिकाधिक शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळाली. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के वाढीसह 2,075.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डेटा पॅटर्न इंडिया कंपनीच्या शेअरचा लॉकइन कालावधी संपल्यानंतर शेअर्समध्ये बंपर तेजी येण्याची शक्यता आहे. शेअरचा लॉकइन कालावधीमध्ये कंपनीच्या मोठ्या शेअर धारकांना स्टॉक लिस्टिंगनंतर शेअर्स विकण्यास बंदी घालण्यात येते. या लॉकइन कालावधीच्या समाप्तीनंतर शेअर्स विक्रीवरील बंदी काढल्यानंतरच गुंतवणुकदार स्टॉक बाजारात विकू शकतात.

डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी डेटा पॅटर्न इंडिया कंपनीचे शेअर 717 रुपये किंमत पातळीवर खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.

डेटा पॅटर्न इंडिया ही कंपनी संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करते. डेटा पॅटर्न कंपनी रडार, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, ब्रह्मोस प्रोग्राम, एविनोक्स, स्मॉल सॅटेलाइट, सॅटेलाइट सिस्टम्स, एटीई आणि एरोस्पेस सिस्टम्स आणि सीओटीएस वस्तू उत्पादन करण्याचे काम करते. 25 फेब्रुवारी 2022 रोजी डेटा पॅटर्न कंपनीचे शेअर्स 608 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

आज हा स्टॉक 2075 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 1 जुलै 2022 रोजी डेटा पॅटर्न कंपनीचे शेअर्स 636 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 2,250.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 706.00 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Data Patterns Share Price today on 17 July 2023.

हॅशटॅग्स

Data Patterns Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x