12 May 2024 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स कंपनीतील या निर्णयाने टाटा मोटर्स शेअर्सवर काय परिणाम होणार? तपशील जाणून घ्या

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासह कंपनीने डिफरेंशियल व्होटिंग राइट्स म्हणजेच डीव्हीआर परिवर्तित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टाटा मोटर्स DVR कंपनीच्या शेअर धारकांना सर्वसाधारण मतदानात 1/10 अधिकार प्राप्त होतात, यासह त्यांना इतर शेअरधारकांच्या तुलनेत 5 टक्के अधिक लाभांश द्यावा लागतो. म्हणून टाटा मोटर्स कंपनीने आता डिफरेंशियल व्होटिंग राइट्स असलेले शेअर्स सर्वसाधारण शेअर्समध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्स कंपनीच्या संचालक मंडळाने आता कंपनीचे डीव्हीआर शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर लिक्विडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने आता NCLT मार्फत व्यवस्था निर्माण करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. या अंतर्गत टाटा मोटर्स कंपनीकडे असलेल्या प्रत्येक 10 DVR शेअर्ससाठी 7 सर्वसाधाणप शेअर जारी केले जाणार आहे. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 645.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सध्या घेतलेल्या नवीन निर्णयानुसार टाटा मोटर्स कंपनीच्या डीव्हीआर शेअरधारकांना प्रति 10 डीव्हीआर शेअर्सवर 7 सर्वसाधारण शेअर्स वाटप केले जाणार आहे. सामान्य शेअरच्या तुलनेत डीव्हीआर शेअर्स स्वस्त असतात. Tata Motors DVR कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग सेशनमध्ये 440 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स DVR शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 421 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील मागील एका आठवड्यात टाटा मोटर्स DVR कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के नफा कमावून दिला आहे.

विविध म्युच्युअल फंडानी Tata Motors DVR कंपनीमध्ये 28.82 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ICICI प्रुडेन्शियल कंपनीने टाटा मोटर्स DVR मध्ये सर्वात जास्त म्हणजे 19.35 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीच्या परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांमध्ये फ्रँकलिन टेम्पलटन, सिंगापूर सरकार आणि व्हॅनगार्ड यासारखे दिग्गज देखील सामील आहेत. दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा राकेश झुनझुनवाला यांनी देखील टाटा मोटर्स DVR कंपनीचे 1.92 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price today on 27 July 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x