10 May 2024 7:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

NINtec Systems Share Price | क्या बात! NINtec शेअरने 6 महिन्यांत 129% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या

NINtec Systems Share Price

NINtec Systems Share Price | एनआईएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअर धारकांसाठी खुश खबर आली आहे. एनआईएनटेक सिस्टम कंपनी आपल्या शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक पाच शेअर्सवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट देखील जाहीर केली आहे. (NINtec Share Price)

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनआईएनटेक सिस्टम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 641.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी एनआईएनटेक सिस्टम कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 661.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

या कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. या काळात एनआईएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 129 टक्के नफा कमावून दिला आहे. एनआईएनटेक सिस्टम कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर धारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 03-08-2023 हा दिवस निश्चित केला आहे.

एनआईएनटेक सिस्टम कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा देण्यासाठी ओळखले जातात. हा स्टॉक NSE आणि BSE या दोन्ही इंडेक्सवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात एनआईएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6.43 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 135.06 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 135.06 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NINtec Systems Share Price today on 28 July 2023.

हॅशटॅग्स

NINtec Systems Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x