11 May 2024 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Hawkins Cookers Share Price | हॉकिन्स की सिटी बाजी! हॉकिन्स कुकर्स शेअरने मालामाल केले, आता डिव्हीडेंट जाहीर, तपशील जाणून घ्या

Hawkins Cookers Share

Hawkins Cookers Share Price | हॉकिन्स कुकर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. कारण स्टॉक काल हा स्टॉक एक्सडिव्हिडंडवर ट्रेड करत होता. हॉकिन्स कुकर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पूर्तता कंपनीने आता केली आहे. (Hawkins Share Price)

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हॉकिन्स कुकर्स कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के वाढीसह 6849.75 रूपये किमतीवर क्लोज झाले होते. याच ट्रेडिंग सेशनमध्ये हॉकिन्स कुकर्स कंपनीचे शेअर्स 6,898 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी हॉकिन्स कुकर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के घसरणीसह 6,648.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात हॉकिन्स कुकर्स लिमिटेड या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 22.78 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात हॉकिन्स कुकर्स कंपनीचे शेअर्स 10 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3622 कोटी रुपये आहे.

हॉकिन्स कुकर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 74.5 अंकावर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी झाला आहे. हॉकिन्स कुकर्स कंपनीचा एक वर्षाचा बीटा 0.2 असून तो खूपच कमी अस्थिरता दर्शवतो. हॉकिन्स कुकर्से कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहेत.

बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी हॉकिन्स कुकर्स लिमिटेड कंपनीची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी कंपनीचे संचालक मंडळ जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करेल. कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश 8 सप्टेंबर 2023 पर्यंत वाटप करेल.

2 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत ज्या लोकांचे नाव कंपनीच्या रजिस्टरमध्ये असेल, त्या गुंतवणुकदारांना पात्र मानले जाईल, आणि लाभांश दिला जाईल. हॉकिन्स कुकर्स कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 22.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावल्याची माहिती आर्थिक निकालात जाहीर केली होती.

2022-23 या आर्थिक वर्षाच्या मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 21.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. FY22 च्या Q4 मध्ये कंपनीने 272.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर Q4 FY23 मध्ये कंपनीने 255.2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2022 तिमाहीत कंपनीने 28.9 कोटी रुपये नफा कमावला होता.चौथ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 32 कोटी रुपये नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षीच्या जून तिमाहीमध्ये 31 कोटी रुपये नोंदवला गेला होता. हॉकिन्स कुकर्स कंपनी मुख्यतः कुकवेअर उत्पादनाच्या व्यापार आणि विक्रीसंबंधित व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hawkins Cookers Share Today on 03 August 2023.

हॅशटॅग्स

Hawkins Cookers Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x