10 May 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Patel Engineering Share Price | सहा महिन्यांत 200 टक्के परतावा देणारा पटेल इंजिनीअरिंग शेअर अप्पर सर्किट तोडतोय, डिटेल्स पहा

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग या नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चढ उताराला सामोरे जात आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 2.69 टक्के घसरणीसह 48.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांत पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के नफा कमावून दिला आहे. 8 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर किंमत 22.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 52 रुपये किमतीवर पोहोचला होता.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 135 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील पटेल इंजिनीअरिंग कपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यांनी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे एकूण 1.68 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी लवकरच आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. नुकताच कंपनीने घोषणा केली होती की, गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जातील.

मार्च 2023 तिमाहीत पटेल इंजिनीअरिंग कंपनीने 16.77 टक्क्यांच्या वाढीसह 1298.03 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर कंपनीने एकूण 208.72 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या ऑर्डर बुकचे एकूण मूल्य 20,000 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x