10 May 2024 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Rishabh Instruments IPO | परवडणारा IPO! फक्त 14,212 रुपये गुंतवा, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा, GMP पहा किती

Rishabh Instruments IPO

Rishabh Instruments IPO | सध्या तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला IPO स्टॉक शोधत असाल तर तुम्ही रिषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावू शकता. काल रिषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO मधे गुंतवणूक करण्यासाठी किमान 14,212 रुपये जमा करावे लागणार आहे.

शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले IPO भांडवल उभारणीसाठी लाँच करत असतात. यात कंपन्या शेअरवर बोली लावणाऱ्या लोकाकडून पैसे घेऊन त्यांना शेअर वाटप करतात. आणि काही दिवसानंतर शेअर बाजारात त्या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होतात. यात गुंतवणूक करण्याचा फायदा म्हणजे, स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढू शकतात.

रिषभ इन्स्ट्रुमेंट्स IPO तपशील :
* IPO सुरू होण्याचा दिवस – 30 ऑगस्ट 2023
* IPO बंद होण्याचा दिवस – 1 सप्टेंबर 2023
* IPO स्टॉक किंमत बँड – 418 रुपये ते 441 रुपये
* IPO इश्यू साइज – 490.78 कोटी
* IPO ची लॉट साइज – 1 लॉटमध्ये 34 शेअर्स
* किमान गुंतवणूक रक्कम – 14212 रुपये.

रिषभ इन्स्ट्रुमेंट्स ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 75 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात लाँच करणार आहे. तुम्ही या IPO मध्ये कमाल 2 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. या IPO मधे कंपनी 75 कोटी रुपयेच्या फ्रेश शेअर्ससोबत 94.28 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. या IPO इश्यू अंतर्गत कंपनीने 50 टक्के कोटा QIB साठी राखीव ठेवला आहे. तर 15 टक्के कोटा एनआयआयसाठी राखीव असेल. आणि 35 टक्के कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार रिषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर ही GMP टिकुन राहिली स्टॉक 520 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. रिषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनीचे शेअर्स 11 सप्टेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनी विजेचे सर्व पॅरामीटर्स मोजण्याचे काम करते.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या भारतात या कंपनीला कोणीही स्पर्धक नाही. ही कंपनी आपल्या क्षेत्रात व्यवसाय करणारी एकमेव कंपनी आहे. ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनी युरोपमधील पोलंडमध्ये 2 प्लांट चालू आहेत. आणि चीनमध्ये 1 प्लांट चालू आहे. या कंपनीची कॅपेसिटी यूटिलाइजेशन क्षमता 50 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rishabh Instruments IPO for investment on 31 August 2023

हॅशटॅग्स

Rishabh Instruments IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x