12 May 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार
x

Tata Consumer Share Price | टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलला टक्कर देणार, शेअर्स तेजीत येणार?

Tata Consumer Share Price

Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी आणि हल्दीराम या दोन्ही कंपन्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीशी थेट स्पर्धा करण्यासाठी हातमिळवणी करणार आहे.

मात्र टाटा कंझ्युमर आणि हल्दीराम कंपनीने हे वृत्त फेटाळून लावले आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध चहा कंपनी Tetley ही Tata Consumer Products ची उपकंपनी आहे. सध्या ती भारतात Starbucks सोबत जॉइंट वेंचर म्हणून काम करत आहे. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के घसरणीसह 856.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हल्दीराम कंपनीचे शेअर्स खरेदी करणार?

मीडिया रिपोर्टनुसार टाटा कंझ्युमर कंपनी हल्दीराम कंपनीचे 51 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. मात्र कंपनीचे मूल्यांकन निश्चित करण्यात सहमती होत नसल्याने डील मध्ये अडथळा आला आहे. हल्दीराम कंपनीने कंपनीचे मूल्यांकन 10 अब्ज डॉलर निश्चित केले आहे, याबाबत टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने असहमती दर्शवली आहे. हल्दीराम कंपनी आपले 10 टक्के भाग भांडवल विकण्यासाठी बेन कॅपिटल कोकोनी चर्चा करत आहे.

स्टॉक एक्स्चेंजने देखील टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीकडून हल्दीराम कंपनीचे अधिग्रहण केल्याच्या बातमीवर सविस्तर स्पष्टीकरण मागवले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह क्लोज झाले होते आणि स्टॉक 883 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

जुलै 2023 मध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 883.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Consumer Share Price today on 07 September 2023.

हॅशटॅग्स

Tata Consumer Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x