18 May 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा
x

HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत खूप मोठी अपडेट आली आहे. लवकरच या कंपनीचे शेअर्स स्वस्त होणार आहेत, कारण कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 2 तुकड्यात विभागले जाणार आहेत. कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून 29 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.17 टक्क्यांच्या घसरणीसह 3870.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक 1.37 टक्के घसरणीसह 3,817.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेकॉर्ड डेट तपशील
1 सप्टेंबर 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स दोन भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीचे दर्शनी मूल्य 5 रुपये होईल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 29 सप्टेंबर 2023 हा दिवस जाहीर केला होता. म्हणजे स्टॉक स्प्लिटची एक्स-डेट एक दिवस आधी असेल.

शेअरची कामगिरी
मागील एका वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 58 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिनाभरापासून हिंदुस्तान एरोनॉटिक्स या डिफेन्स कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. या काळात हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक 4 टक्के कमजोर झाला होता.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4180 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2242 रुपये होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 129421.34 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price today on 25 September 2023.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x