18 May 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

IRFC Vs Ircon Share | रेल्वे संबंधित शेअर्स मालामाल करत आहेत, IRFC की इरकॉन इंटरनॅशनल स्टॉक बेस्ट, कोण होणार अल्पावधीत मल्टिबॅगर?

IRFC Vs Ircon Share

IRFC Vs Ircon Share | मागील एक वर्षापासून शेअर बाजारात रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार कामगिरी करून गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आता इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने श्रीलंका रेल्वे आणि श्रीलंकेच्या परिवहन मंत्रालयाशी एक व्यापारी करार संपन्न केला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 122 कोटी रुपये मूल्याचे एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 141.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, कंपनीला 14.89 दशलक्ष डॉलर्स महणेजच भारतीय चलनात 122 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे. कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट श्रीलंकेच्या सरकारने दिले आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला माही जंक्शन ते अनुराधापुरा पर्यंत दूरसंचार प्रणाली डिझाइन, स्थापित आणि चाचणी करण्याचे काम मिळाले आहे.

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने याबाबत संपूर्ण माहिती 21 सप्टेंबर 2023 रोजी सेबीला कळवली आहे. इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला हे काम पूर्ण करण्यासाठी फक्त 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 141.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 259 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 166 टक्के वाढले आहे. मागील एका महिन्यात इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Ircon Share today on 26 September 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Ircon Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x