18 May 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
x

Tata Steel Share Price | पोलादी शेअर तेजीत! टाटा स्टील शेअरचे रेटिंग वाढताच शेअर रॉकेट बनतोय, पुढची शेअर टार्गेट प्राईस?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मंगळवारी बीएसईवर टाटा स्टीलचा शेअर जवळपास 3 टक्क्यांनी वधारून 130०.55 रुपयांवर पोहोचला. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये ही वाढ रेटिंग अपग्रेडनंतर आली आहे. विदेशी रेटिंग कंपनी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने टाटा स्टीलचा दृष्टीकोन बदलून तो स्थिर केला आहे.

तसेच कंपनीचे दीर्घकालीन रेटिंग ही अपग्रेड करण्यात आले आहे. मूडीजने कंपनीच्या नफ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आणि कर्ज कमी करण्याचे प्रयत्न लक्षात घेऊन हे रेटिंग अपग्रेड केले आहे.

कंपनीचे रेटिंग Ba1 वरून Baa3 करण्यात आले आहे
मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने टाटा स्टीलचे दीर्घकालीन रेटिंग बीए१ वरून बीएए३ केले आहे. मूडीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष कौस्तुभ चौबल म्हणतात, “स्टीलच्या किमती कमी झाल्याने महसुलाला धक्का बसेल, त्यानंतरही कंपनीच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.” यावर्षी जूनमध्ये मूडीजने टाटा स्टीलचा दृष्टीकोन स्थिर ते सकारात्मक केला होता, तर बीए 1 कॉर्पोरेट फॅमिली रेटिंग कायम ठेवले होते.

वर्षभरात टाटा स्टीलचा शेअर 31 टक्क्यांनी वधारला
गेल्या वर्षभरात टाटा स्टीलचे शेअर्स जवळपास 31 टक्क्यांनी वधारले आहेत. 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई शेअर बाजारात स्टील कंपनीचा शेअर 99.85 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 26 सप्टेंबर 2023 रोजी बीएसईवर 130.55 रुपयांवर पोहोचला आहे.

टाटा स्टीलचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आहेत. टाटा स्टीलचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर 134.85 रुपयांवर पोहोचला. तर, कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 95 रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Tata Steel Share Price on 26 September 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x