12 May 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
x

KSB Share Price | असे मल्टिबॅगर शेअर्स निवडा! केएसबी शेअरने अल्पावधीत दिला 600 टक्के परतावा, शेअर पुढेही फायद्याचा

KSB Share Price

KSB Share Price | मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केएसबी लिमिटेड कंपनीचे तेजीत वाढत होते. केएसबी लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10280 कोटी रुपये आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के नफा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 57.09 टक्के नफा कमावून दिला आहे. आणि मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 46.09 टक्के वाढले आहेत.

5 ऑक्टोबर 2018 रोजी केएसबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 685 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक या किंमत पातळीवरून 331 टक्के वाढला आहे. 30 ऑक्टोबर 2020 रोजी केएसबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 452 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून स्टॉक 600 टक्के वाढला आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी केएसबी लिमिटेड स्टॉक 1.83 टक्के वाढीसह 3,005.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

केएसबी लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला प्रधानमंत्री कुसुम-3 योजनेअंतर्गत घटक-बी मध्ये 816 वॉटर पंपिंग सिस्टीमचा पुरवठा करण्यासाठी 28 कोटी रुपये मूल्याचे एक काम देण्यात आले आहे. ही आदेश चालू कॅलेंडर वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. केएसबी लिमिटेड कंपनीला यापूर्वी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने 55 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर आर्थिक वर्ष 2026 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

केएसबी लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पॉवरवर चालणारे पंप आणि औद्योगिक वाल्व बनवण्याचे काम करते. यासह ही कंपनी कंट्रोल व्हॉल्व्ह, डिह्युमिडिफायर हीट अ‍ॅक्ट्युएटर आणि स्पेअर पार्ट्स बनवण्याचे देखील काम करते. केएसबी लिमिटेड या कंपनीच्या ग्राहक वर्गामध्ये ऊर्जा, तेल आणि वायू, पाणी आणि बांधकाम उद्योग करणाऱ्या अनेक दिग्गज कंपन्या सामील आहेत.

मागील काही दिवसांपासून केएसबी लिमिटेड कंपनीच्या निर्यातीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने आता आपले लक्ष सौरऊर्जा निर्मिती व्यवसायावर केंद्रीत केले आहे. जून 2023 तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्के अधिक नफा कमावला आहे. यासह कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के लाभांश वाटप केला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत केएसबी लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 616.5 कोटी रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KSB Share Price 02 October 2023.

हॅशटॅग्स

KSB Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x