11 May 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Shakti Pumps Share Price | मजबूत मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 815% परतावा, मजबूत ऑर्डरबुक'मुळे पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळेल

Shakti Pumps Share Price

Shakti Pumps Share Price | शक्ती पंप इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1068 कोटी रुपये आहे.भारत सरकारच्या PM कुसुम-3 योजनेअंतर्गत शक्ती पंप इंडिया कंपनीला अजमेर विद्युत वितरण निगम लिमिटेड कंपनीकडून 150 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी शक्ती पंप इंडिया स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 897.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शक्ती पंप इंडिया कंपनीला सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमची देखील ऑर्डर मिळाली आहे. शक्ती पंप कंपनीने नुकताच उत्तर प्रदेश कृषी विभागाकडून देखील PM कुसुम 3 योजने अंतर्गत घटक B साठी 10000 पंपांचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळविली होती. या ऑर्डरचे एकूण मुल्य 293 कोटी रुपये होते. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमचा पुरवठा, स्थापना आणि कार्यान्वित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शक्ती पंप कंपनीने नुकताच चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीने 113 कोटी रुपये महसूल संकलित केला होत. आणि कंपनीने 8.46 कोटी रुपये कामकाजी नफा कमावला होता. 28 ऑक्टोबर 2011 रोजी शक्ती पंप इंडिया स्टॉक 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता हा स्टॉक 19 पट वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे.

शक्ती पंप कंपनीचे शेअर 3 एप्रिल 2020 रोजी 114 रुपये या नीचांक किंमत पातळी वरून 800 टक्के वाढले आहेत. 28 ऑक्टोबर 2011 रोजी या कंपनीचे शेअर्स 45 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 19 फेब्रुवारी 2016 रोजी शक्ती पंप कंपनीचे शेअर्स 100 रुपये किमतीवर पोहचले होते. या किमती वरून हा स्टॉक आता 815 टक्के वाढला आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 963 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 381 रुपये होती. आहे. मागील एका महिन्यात शक्ती पंप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 113 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shakti Pumps Share Price today on 11 October 2023.

हॅशटॅग्स

Shakti Pumps Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x