12 May 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Servotech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने एका वर्षात 1300 टक्के परतावा दिला, वेळीच फायदा घ्या

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. मागील काही दिवसांत सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सर्व्होटेक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1300 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1590 कोटी रुपये आहे.

सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 100 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 12.5 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम स्टॉक 4.13 टक्के घसरणीसह 74.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीने नुकताच सेबीला कळवले आहे की, कंपनी ऊर्जा व्यवस्थापन तंत्रज्ञानाशी संबंधित दोन पेटंट अर्ज दाखल करणार आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टीम ही कंपनी ईव्ही चार्जर आणि सोलर सोल्यूशन्स क्षेत्रात आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीने नाविन्यपूर्ण ऊर्जा व्यवस्थापन तंत्रज्ञानाशी संबंधित दोन पेटंट अर्ज दाखल केले आहेत.

सर्व्होटेक पॉवर कंपनीने ग्रिड सेवा ऑप्टिमायझेशन सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर संशोधन सुरू केले होते, त्यात कंपनीला यश मिळाले आहे. या कंपनीने बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीसाठी देखील पेटंट अर्ज दाखल केला आहे. कंपनीने आपल्या संशोधनाच्या माध्यमातून अक्षय ऊर्जेचे शाश्वत ऊर्जेमध्ये रूपांतर करून त्याचे जास्तीत जास्त मूल्य प्राप्त केले आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जेचे शाश्वत ऊर्जेत रूपांतर करणे अजून सोपे होणार आहे.

सर्व्होटेक पॉवर सिस्टीम कंपनीचे म्हणणे आहे की, सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या या नवकल्पनांमुळे ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रात परिवर्तन होईल. नुकताच सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीने आपले शेअर्स विभाजित केले होते. या कंपनीने आपले शेअर्स 2 : 1 या प्रमाणात विभाजित केले होते.

या कंपनीने आपले 2 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर 2 इक्विटी शेअर्समध्ये विभाजित केले होते. आता कंपनीच्या शेअरचे नवीन दर्शनी मूल्य 1 रुपये आहे. सर्व्होटेक पॉवर कंपनीने मार्च तिमाहीमध्ये 6.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीने 1.30 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीने 115.3 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE 26 October 2023.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x