9 May 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Welspun Corp Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वेलस्पन कॉर्प शेअरने अल्पावधीत दिला 116 टक्के परतावा, हा शेअर खरेदी करावा?

Welspun Corp Share Price

Welspun Corp Share Price| मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना वेलस्पन कॉर्प कंपनीचे शेअर्स 1.71 टक्क्यांच्या वाढीसह 488 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. वेलस्पन कॉर्प कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12750 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात वेलस्पन कॉर्प स्टॉकची किंमत 16 टक्के वाढली आहे.

मागील 6 महिन्यांत वेलस्पन कॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 116 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 800 टक्के वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी वेलस्पन कॉर्प स्टॉक 0.90 टक्के घसरणीसह 524.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

13 सप्टेंबर 2013 रोजी वेलस्पन कॉर्प स्टॉक 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून हा स्टॉक आतापर्यंत 1600 टक्क्यांनी वाढला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आकाश भन्साळी यांनी देखील वेलस्पन कॉर्प स्टॉक खरेदी केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसुल संकलनात 107 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

या तिमाहीत कंपनीने 4059 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत वेलस्पन कॉर्प कंपनीचा EBITDA 994 टक्क्यांच्या वाढीसह 501 कोटी रुपये नोंदवला गेला होता. सध्या वेलस्पन कॉर्प कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 8000 कोटीचे ऑर्डर प्रलंबित आहेत.

या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदाराना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. वेलस्पन कॉर्पोरेशन ही कंपनी वेलस्पन ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी मुख्यतः मोठ्या व्यासाचे पाईप्स बनवण्याचे काम करते. जागतिक स्तरावर व्यवसाय करणारी वेलस्पन कॉर्प कंपनी पाईपशी संबंधित सर्व आवश्यकतांची पूर्तता करणारी एक स्टॉप शॉप म्हणून व्यवसाय करत आहे. या कंपनीकडे उच्च दर्जाच्या लाइन पाईप्सचे विविध श्रेणी उपलब्ध आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Welspun Corp Share Price NSE 14 November 2023.

हॅशटॅग्स

Welspun Corp Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x