10 May 2024 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल
x

IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे संबधित शेअर्स श्रीमंत करत आहेत! मिळतोय हजारोत परतावा, वेळीच फायदा घेणार का?

IRFC Vs Titagarh Rail Share

IRFC Vs Titagarh Rail Share | मागील काही महिन्यांपासून टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर आज या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1046 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टीम्स स्टॉक 2.43 टक्के घसरणीसह 975.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी टिटागड रेल सिस्टीम्स स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 485 टक्के वाढले आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही एक वर्षापूर्वी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.85 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12 लाख रुपये झाले असते.

टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीने स्वीडिश-स्विस बहुराष्ट्रीय कंपनी ABB सोबत धोरणात्मक भागीदारी करार केला आहे. या भागीदारी अंतर्गत, या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे मेट्रो रेल्वेसाठी प्रोपल्शन प्रणाली तयार करण्याचे काम करणार आहे.

टिटागड रेल सिस्टीम्स कंपनी ट्रेनचे डब्बे बनवणारी मुख्य कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः रोलिंग स्टॉकचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा, कमिशनिंग आणि सर्व्हिसिंगसाठी सुविधा प्रदान करण्याचे काम करते. टिटागड रेल सिस्टीम्स कंपनी सोबतच्या कराराने एबीबी कंपनीचे शेअर्स देखील तेजीत वाढत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Titagarh Rail Share NSE 22 November 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Titagarh Rail Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x