17 May 2024 9:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

IREDA IPO | 32 रुपयाचा शेअर एकदिवसात तब्बल 37 टक्के परतावा देऊ शकतो, स्वस्त IPO शेअर चर्चेत

IREDA IPO

IREDA IPO | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्यास सज्ज झाले आहेत. तज्ञांच्या मते पहिल्याच दिवशी या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किंमत करतील. आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO 38 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते.

आयआरईडीए कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30-32 रुपये निश्चित केली होती. आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स 32 रुपये या अप्पर किमतीवर वाटप करण्यात आले. ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 12 रुपये प्रीमियम किमतीवर टिकुन राहिला तर, कंपनीचे शेअर्स 44 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 37 टक्के नफा मिळू शकतो.

आयआरईडीए या सरकारी कंपनीचा IPO एकूण 38.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 24.16 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 104.57 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

या कंपनीच्या IPO मध्ये कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा 9.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार आयआरईडीए आयपीओमध्ये किमान 1 लॉट आणि आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकत होते. आणि 13 लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 191360 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA IPO for investment on 28 November 2023.

हॅशटॅग्स

IREDA IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x