21 May 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, सकारात्मक घटनांमुळे शेअर्स फायद्याची मोठी कामगिरी करणार?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, बीपीसीएल, कोल इंडिया या कंपनीच्या शेअरमधील तेजीच्या जोरावर सेन्सेक्स 66174 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 19889 अंकावर पोहचला होता.

दरम्यानच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील 316 शेअर्सनी 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. तर 34 शेअर्सनी नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. त्यात एकूण 14 शेअर्स अप्पर सर्किटमध्ये आणि 13 शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स इंडेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 3.56 टक्क्यांच्या वाढीसह 697.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बंद बजाज फिनसर्व्ह आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

बजाज फायनान्स, एनटीपीसी, भारती एअरटेल, टायटन आणि अॅक्सिस बँक स्टॉक 1 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के वाढीसह 701.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिड आणि लार्ज कॅप इंडेक्समध्ये अदानी ग्रुप स्टॉक धुमाकूळ घालत होते. अदानी टोटल गॅस स्टॉक कालच्या व्यवहारात 20 टक्के वाढीसह 644.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर अदानी ट्रान्समिशन म्हणजेच अदानी एनर्जी सोल्युशन स्टॉक 18.65 टक्के वाढीसह 865.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स काल 12.33 टक्क्यांच्या वाढीसह 446 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर अदानी ग्रीन स्टॉक 12.25 टक्क्यांच्या वाढीसह 1052.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह आणि अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 8.89 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. अदानी पोर्ट्स स्टॉक 5.29 टक्क्यांनी आणि अंबुजा सिमेंट स्टॉक 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. ACC कंपनीने शेअर्स 2.75 टक्के वाढीसह आणि NDTV स्टॉक 12.02 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मंगळवारी शेअर बाजारातील 10 कंपन्यांचे शेअर्स बाजार मूल्यांकन वाढून 11.31 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन अंती शेअर बाजाराचे मूल्यांकन 10.26 लाख कोटी रुपयेवर पोहोचले आहेत.

हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहावर जे आरोप करण्यात आले आहे. त्याची चौकशी करणाऱ्या सेबीवर संशय घेणे योग्य नाही असे मत न्यायालयाने मांडले आहे. हिंडेनबर्ग अहवालात जे आरोप करण्यात आले आहे, ते दावे पूर्णपणे तथ्यांवर आधारित नाही, असे मत सेबीने मांडले होते. या प्रकरणी न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आशियातील इतर शेअर बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट शेअर बाजार उच्च पातळीवर क्लोज झाला होता.

जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरणीसह क्लोज झाला होता. युरोपातील प्रमुख शेअर बाजार तोट्यामध्ये ट्रेड करत होते. सोमवारी अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह क्लोज झाला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 1.19 टक्क्यांच्या वाढीसह 80.93 डॉलर प्रति बॅरल किमतीवर पोहोचले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE 29 November 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x