10 May 2024 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Buyback of Shares | भरवशाचा TCS शेअर अल्पावधीत देईल मोठा फायदा, शेअर्स बायबॅक'बाबत अधिक अपडेट जाणून घ्या

Buyback of Shares

Buyback of Shares | भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने 1 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत 17,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर बायबॅक करण्याची योजना जाहीर केली आहे. या बायबॅक अंतर्गत कंपनीचे गुंतवणूकदार आपले शेअर्स कंपनीला 4,150 रुपये किमतीवर विकू शकतात. हा बायबॅक 7 डिसेंबर 2023 पर्यंत टेंडरिंगसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. TCS Buyback of Shares

2 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या लहान शेअर धारकांची पात्रता गुणोत्तर निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारख म्हणून 25 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता. आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के वाढीसह 3,510.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनी आपल्या बायबॅकच्या माध्यमातून सुमारे 17 टक्के शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी करणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने या बायबॅकसाठी खरेदी किंमत 4,150 रुपये निश्चित केली आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 3457.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 3470.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

टीसीएस कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, या बायबॅकमुळे कंपनीचा EPS 58.52 रुपयेवरून vashun 59.18 रुपयेवर जाईल. तर कंपनीचा नेट वर्थ 49.89 टक्केवरून वाढून 62.56 टक्केवर जाईल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 72.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. बायबॅक नंतर हे प्रमाण 72.41 टक्केवर जाईल. टाटा समूहाच्या दोन दिग्गज होल्डिंग कंपन्यामध्ये टाटा सन्स आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या दोन्ही कंपन्यानी बायबॅकमध्ये भाग घेण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Buyback of Shares launch by TCS on 29 November 2023.

हॅशटॅग्स

Buyback of Shares(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x