17 May 2024 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

IFL Share Price | होय! फुकट शेअर्स मिळतील, फक्त 4 रुपयाचा पेनी शेअर या तारखेपूर्वी खरेदी करा, पहा अपडेट

IFL Share Price

IFL Share Price | IFL एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी सलग दुसऱ्या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने आता बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

IFL एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी IFL एंटरप्रायझेस स्टॉक 4.80 टक्के घसरणीसह 3.77 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

4 डिसेंबर 2023 रोजी IFL एंटरप्रायझेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक 10 शेअर्सवर एक शेअर बोनस वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने 18 डिसेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. यापूर्वी 2022 मध्ये IFL एंटरप्रायझेस कंपनीने 1 शेअरवर 1 बोनस शेअर वाटप केला होता.

एप्रिल 2023 मध्ये IFL एंटरप्रायझेस कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित केले होते. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षात IFL एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 37 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. IFL एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4.14 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFL Share Price BSE 06 December 2023.

हॅशटॅग्स

#IFL Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x