16 May 2024 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

IREDA Share Price | अल्पावधीत 275% परतावा IREDA शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू, शेअर अजून घसरून स्वस्त होणार?

IREDA Share Price

IREDA Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेले आणि अवघ्या 15 दिवसांत दुप्पट परतावा देणाऱ्या IREDA कंपनीचे शेअर्स शुक्रवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 108.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण नफा वसुलीमुळे पाहायला मिळाली होती.

मिनीरत्न दर्जा असलेल्या IREDA कंपनीचा IPO मागील महिन्यात 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअर्सची किंमत बँड 30-32 रुपये निश्चित करण्यात आली होती. 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 123.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

IREDA कंपनीच्या शेअर्सने आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना 275 टक्के परतावा कमावून दिला आहे. IREDA कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. या कंपनीच्या IPO ची किंमत बँड 30-32 रुपये होती. तर हा स्टॉक 32 रुपये किमतीवर वाटप करण्यात आला होता.

29 नोव्हेंबर 2023 रोजी या मिनीरत्न कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तर 14 डिसेंबर 2023 रोजी IREDA कंपनीचे शेअर्स 123 37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी IPO इश्यू किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना 275 टक्के परतावा कमावून दिला आहे.

IREDA कंपनीचा IPO एकूण 38 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या सरकारी कंपनीच्या IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 24.16 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

या कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सच्या राखीव कोटयाला 104.57 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. कंपनीच्या कर्मचाऱ्याचा राखीव कोटा 9.80 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 14 लॉट खरेदी करू शकत होते. एका लॉटमध्ये कंपनीने 460 शेअर्स ठेवले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE 16 December 2023.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x