17 May 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडेल तुमच्यावर! 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळतील, 68 रुपयाचा शेअर खरेदी करा

Bonus Shares

Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. Salasar Techno Engineering Share Price

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.51 टक्के वाढीसह 65.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.59 टक्के वाढीसह 68.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड या इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्माण घेतला होता. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर 4 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

मात्र कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाहीये. बोनस शेअर्सचे वितरण कंपनीच्या सिक्युरिटीज प्रीमियम खात्यातून केले जाणार आहे. सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना बोनस शेअर्स जारी करण्यासाठी 126 कोटी रुपये खर्च करणार आहे.

मागील तीन वर्षात सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 408 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 314 टक्के वाढली आहे. YTD आधारे सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 19 टक्के वाढवले आहेत.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,012.62 कोटी रुपये आहे. सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचा IPO 2017 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी या कंपनीचा IPO भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक सबस्क्राइब होणार IPO ठरला होता, जो 273.05 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Salasar Techno Engineering Share Price 22 December 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x