11 May 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Allcargo Share Price | 140 टक्के परतावा देणारा ऑलकार्गो लॉजिस्टिक्स शेअर पुन्हा तेजीत, 1 दिवसात 7.91% वाढला

Allcargo Share Price

Allcargo Share Price | ऑलकार्गो लॉजिस्टिक्स या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अप्रतिम तेजीत पैसे गुणाकार करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 314 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजेच कंपनीने आपल्या व्यवसायाशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे.

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनी आपला आंतरराष्ट्रीय व्यवसाय ECU वर्ल्डवाइड ऑलकार्गो ECU या लिस्टेड कंपनीतून विलग करणार आहे. ऑलकार्गो कंपनी आपला आंतरराष्ट्रीय सप्लाय चेन व्यवसाय डिमर्ज करणार आहे. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 7.91 टक्के वाढीसह 307.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या डिमर्जरची यशस्वी अमलबजावणीस झाल्यास कंपनीच्या शेअरधारकांना प्रत्येक 10 शेअर्सवर ऑलकार्गो ईसीयू कंपनीचा एक शेअर मिळेल. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स ही कंपनी एक्सप्रेस आणि कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक व्यवसाय चालवत राहील. त्याच वेळी ऑलकार्गो गती कंपनी ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये विलीन केली जाईल. Allcargo Gati या कंपनीच्या प्रत्येक 10 शेअर्सवर गुंतवणूकदारांना 63 शेअर्स दिले जातील.

मागील 3 वर्षात ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 डिसेंबर 2020 रोजी ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 132.40 रुपये किमतीवर ट्रेड होते. तर 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 314 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 10 टक्के वाढली आहे.

मागील एका वर्षात ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 21 टक्के घसरण पहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 442.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 246 रुपये होती.

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर देखील वाटप केले आहेत. डिसेंबर 2015 मध्ये ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Allcargo Share Price BSE 23 December 2023.

हॅशटॅग्स

Allcargo Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x