12 May 2024 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, ही आहे शेअरची पुढची टार्गेट प्राईस

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळाली आहे. टाटा स्टील कंपनीने 25 जानेवारी 2024 रोजी आपल्या शेअरधारकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये कंपनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

या बैठकीत टाटा स्टील कंपनी आपल्या उपकंपनीचे विलीनीकरण करण्यावरही चर्चा करू शकते. दरम्यान सकारात्मक बातमीच्या पार्श्वभूमीवर टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.87 टक्के वाढीसह 133.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

शुक्रवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये टाटा स्टील कंपनीने माहिती कळवली की, टाटा स्टील कंपनी आपली उपकंपनी इंडियन स्टील अँड वायरचे विलीनीकरण करण्याबाबत विचार करणार आहे. टाटा स्टील कंपनी म्हंटले की, “एनसीएलटीने टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या इक्विटी शेअरधारकांची गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा इतर ऑडिओ – व्हिज्युअल माध्यमांद्वारे बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार शेअरधारकांची बैठक 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता शेअरधारकांची रिमोट ई-व्होटिंग प्रक्रिया सुरू होईल आणि बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता ही ई-व्होटिंग प्रक्रिया पूर्ण होईल.

टाटा स्टीलने 2022 मध्ये आपल्या सहा उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. 22 सप्टेंबर 2022 रोजी टाटा स्टील कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, टाटा स्टील कंपनीने वायर उत्पादने, टाटा स्टील लॉंग प्रॉडक्ट्स, टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, टाटा मेटालिक्स, टीआरएफ, द इंडियन स्टील अँड वायर, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड, एस अँड टी मायनिंग या सर्व कंपन्यांचे टाटा स्टील लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.

टाटा स्टील कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक टीव्ही नरेंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार ही विलीनीकरण प्रक्रिया आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. टाटा स्टील कंपनीमध्ये अधिक समन्वय निर्माण व्हावा आणि खर्च कमी व्हावा या उद्देशाने कंपनीने हा विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

सकारात्मक बातमीमुळे अनेक ब्रोकरेज फर्म टाटा स्टील कंपनीच्या शेअरबाबत उत्साही आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या शेअरची टार्गेट किंमत 145 रुपयेवरून वाढवून 160 रुपये केली आहे. आशियाई फ्लॅट स्टीलच्या किमती मार्च-ऑक्टोबर 2023 या काळात 22 टक्क्यांनी खाली आल्या होत्या. मात्र मागील दोन महिन्यांत या स्टीलमधे 8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE 23 December 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x