11 May 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Bonus Shares | फुकट मिळणार मल्टिबॅगर शेअर्स? शेअरने दिला 10,000 टक्के परतावा, वेळीच एन्ट्री घेणार?

Bonus Shares

Bonus Shares | केपीआय ग्रीन एनर्जी या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 1402.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता KPI ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा देणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या शेअरधारकांना दुसऱ्यांदा बोनस शेअर्स वाटप करणार आहे. KPI Green Energy Share Price

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शनिवार 30 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकते. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 2.36 टक्के वाढीसह 1,365.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 300 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. 30 एप्रिल 2020 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 13.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1402.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या काळात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10000 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे.

28 डिसेंबर 2022 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 438.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 200 टक्क्यांपेक्षा जास्त मजबूत झाले आहेत. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1413.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 378.48 रुपये होती. जानेवारी 2023 मध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच या कंपनीने लोकांना एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत दिला होता.

KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या सोलर पोर्टफोलिओची क्षमता 356 MW आहे . केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे 300 कोटी रुपये निधी उभारणी केली आहे, यात सोसायटी जनरल बीओएफए सिक्युरिटीज, गोल्डमन सॅक्स आणि क्वांट म्युच्युअल फंड यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on KPI Green Energy Share Price 29 December 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x