11 May 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Stocks To Buy | कमाईची संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 39 टक्के परतावा, बँक FD पेक्षा अनेकपट पैसा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात गेल इंडिया लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीला 2024 वर्षाचे टॉप पिक स्टॉक म्हणून निवडले आहे. गॅसच्या किमतीत झालेली वाढ, आणि गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे नवीन प्रकल्प पाहता ब्रोकरेज फर्मने या स्टॉकच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 39 टक्क्यांनी वाढवली आहे. GAIL Share Price

शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 3.25 टक्क्यांच्या वाढीसह 162.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2023 या वर्षात गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 68 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 140 रुपयेवरून वाढवून 195 रुपयेवर नेली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी वाढू शकतो. 2023 या वर्षात गेल इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. गॅस मार्केटिंग आणि ट्रान्समिशन क्षेत्रात काम करणाऱ्या गेल इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.06 लाख कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, पेट्रोकेमिकल्स व्यवसाय क्षेत्रातील चांगले ट्रान्समिशन व्हॉल्यूम आणि टर्नअराउंड कंपनीच्या ROE मध्ये सुधारणा करेल. या कंपनीचा ROE आर्थिक वर्ष 2023 मध्ये 9.5 टक्के या नीचांक पातळीवरून आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीचा ट्रान्समिशन व्हॉल्यूम आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये 9 टक्के CAGR वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या घरगुती गॅस उत्पादनामुळे कंपनीचा वोल्युम वाढण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक वर्ष 2024-26 दरम्यान गेल इंडिया लिमिटेड कंपनी 64 टक्के वाढीव कॅपेक्स साध्य करेल आणि 2026 पर्यंत कंपनी 4560 कोटी रुपये रोख प्रवाह निर्माण करेल. गेल इंडिया लिमिटेड कंपनीचा समायोजित EPS 13.7 अंकावर आहे. आर्थिक वर्ष 2023-26 दरम्यान कंपनीचा EBITDA 32 टक्के CAGR राहण्याची शक्यता आहे. म्हणून तज्ञांनी गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 195 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy GAIL Share Price NSE Live 30 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x