12 May 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये बंपर उसळी येणार, वाढीचे कारण आणि टार्गेट प्राईस जाणून घ्या

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI कडे परवानगी अर्ज दाखल केला आहे.

या बातमीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 243.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 241.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 2.32 टक्के वाढीसह 247 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत 278.20 रुपये होती.

मागील वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्री कंपनीतून विलगीकरण झाल्यानंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. ब्रोकरेज फर्म केआर चोक्सीच्या तज्ञांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरवर 290 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी RBI नोंदणीकृत नॉन बैंकिंग फायनान्स कंपनी आहे.

आर्थिक वर्ष 2023 पर्यंत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने 31.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जिओ फायनान्शिअल कंपनीच्या सेवाबाबत सकारात्मक वाढीच्या संकेतांमुळे कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याची शक्यता आहे. आता जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लवकरच म्युच्युअल फंड क्षेत्रात देखील पदार्पण करणार आहे. SEBI कडून याबाबत मंजुरी मिळाली तर मुकेश अंबानी यांची जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी ब्लॅकरॉक कंपनी सोबत संयुक्त उपक्रम स्थापन लावून म्युचुअल फंड व्यवसाय सुरू करेल.

जुलै 2023 मध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि अमेरिकेतील ब्लॅकरॉक कंपनीने भारतात मालमत्ता व्यवस्थापन सेवा सुरू करण्यासाठी 50:50 या प्रमाणात संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. जिओ फायनान्शिअल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्या संयुक्त उपक्रमात प्रत्येकी 150 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करणार आहेत.

AMFI च्या फेरबदलानंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने लार्जकॅप विभागात प्रवेश केला आहे. सध्याची लार्जकॅप मर्यादा 67,000 कोटी रुपये असून जून 2023 पूर्वी ही मर्यादा फक्त 49,700 कोटी रुपये होती. जून 2023 नंतर शेअर बाजारातील काही शेअर्स मिडकॅप स्टॉकवरून अपडेट करून लार्जकॅप गटात सामील करण्यात आले आहेत. यामधे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, IRFC, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, पॉलीकॅब इंडिया, REC, श्रीराम फायनान्स यूनियन बँक आणि IOB या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Share Price NSE Live 05 January 2024.

हॅशटॅग्स

Jio Financial Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x