12 May 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Indusind Bank Share Price | इंडसइंड बँकेचा शेअर देईल मजबूत परतावा, शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Indusind Bank Share Price

Indusind Bank Share Price | नुकताच इंडसइंड बँकेने आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. इंडसइंड बँकेने या तिमाहीत 17 टक्के वाढीसह 2,301 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत इंडसइंड बँकेने 1,964 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

डिसेंबर 2023 तिमाहीत इंडसइंड बँकेने 13968 कोटी रुपये महसूल संकलन केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत इंडसइंड बँकेने 11,534 कोटी महूसल संकलित केला होता. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी इंडसइंड बँकेचे शेअर्स 3.14 टक्के घसरणीसह 1,562.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत इंडसइंड बँकेचा एकूण NPA एकूण कर्जाच्या 1.92 टक्के घसरला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत इंडसइंड बँकेचा NPA एकूण कर्जाच्या 2.06 टक्के नोंदवला गेला होता. इंडसइंड बँकेचा निव्वळ एनपीए देखील आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत 0.57 टक्क्यांवर आला होता. एका वर्षापूर्वी या बँकेचा एनपीए 0.62 टक्के होता.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडसइंड बँकेचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने इंडसइंड बँकेच्या शेअरवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी इंडसइंड बँकेच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स 1900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. इंडसइंड बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,694.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 990.25 रुपये होती. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या मते, इंडसइंड बँक मालमत्ता गुणवत्ता आणि परतावा गुणोत्तर या दोन्हीमध्ये सतत सुधारणा करत आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत इंडसइंड बँकेच्या प्रवर्तकांकडे बँकेचे 16.45 टक्के भाग भांडवल होते. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे या बँकेचे 83.55 टक्के भाग भांडवल होते. आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीपर्यंत इंडसइंड बँकेच्या प्रवर्तकांनी या बँकेचे 16.47 टक्के भाग भांडवल धारण केले होते. म्हणजेच या एका तिमाहीत बँकेच्या प्रवर्तकांनी काही प्रमाणात शेअर्स विकले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indusind Bank Share Price NSE Live 19 January 2024.

हॅशटॅग्स

#IndusInd Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x