14 May 2024 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Integra Essentia Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! इंटिग्रा इसेन्शिया कंपनीबाबत अपडेट, शेअर्सवर काय परिणाम होणार?

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र काही शेअर्स या मंदीच्या काळात देखील तेजीत वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 650 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.65 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.11 टक्के घसरणीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. भारतातील दिग्गज सरकारी विमा कंपनी LIC ने देखील इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीने नवीन सिक्युरिटीज शेअर बाजारात सूचीबद्ध केले होते, जे बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 पासून शेअर बाजारात ट्रेड करत आहेत.

13 जानेवारी 2024 रोजी इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीने 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले 45.70 कोटी बोनस सिक्युरिटी शेअर्स जारी केले होते, जे आता ट्रेड करत आहेत. 18 डिसेंबर 2023 रोजी इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 7.10 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे.

इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 163 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.80 रुपयेवरून वाढून 7.10 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 103 टक्के परतावा कमावला आहे.

7 मार्च 2022 रोजी इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 83 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांना आता 828 टक्के नफा मिळाला आहे. इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीत एलआयसी कंपनीने गुंतवणूक केली आहे. LIC कंपनीने इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीचे 48.59 लाख शेअर्स होल्ड केले आहेत.

एलआयसी कंपनीने इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर खरेदी केले होते. मागील 3 वर्षांत इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 39 पैसे या नीचांक किंमत पातळीवरून 3300 टक्क्यांनी वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 25 January 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x