15 May 2024 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Sandur Manganese Share Price | फ्री शेअर्सचा पाऊस! 2000% परतावा देणारा शेअर खरेदी करून अल्पावधीत पैसा वाढवा

Sandur Manganese Share Price

Sandur Manganese Share Price | संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. या कंपनीचे शेअर्स 150 रुपये किमतीवरून वाढून 3200 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत मजबूत कामगिरी केली आहे.

या कालावधीत संदूर मँगनीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.38 टक्के वाढीसह 3,373.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 5 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 5 बोनस शेअर्स देणार आहे. या कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 2 फेब्रुवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षांपेक्षा कमी कालावचीत 2000 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

9 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 150.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 जानेवारी 2024 रोजी संदूर मँगनीज कंपनीचे शेअर्स 3201.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच या 4 वर्षांत कंपनीच्या शेअर्सची किंमत 2021 टक्के वाढली आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 297 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3258 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 852.20 रुपये होती.

मागील एका वर्षात संदूर मँगनीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 237 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 जानेवारी 2023 रोजी संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 952.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3201.30 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 6 महिन्यांत संदूर मँगनीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 159 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 1237.35 रुपये किमतीवरून वाढून 3201.30 रुपये किमतीवर पोहचले आहे. मागील 5 दिवसांत संदूर मँगनीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sandur Manganese Share Price today on 29 January 2024.

हॅशटॅग्स

Sandur Manganese Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x