9 May 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान? Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे 5 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा
x

NBCC Share Price | या स्वस्त शेअरने अवघ्या 3 वर्षात 850% परतावा दिला, वेळीच खरेदी करा, कंपनी ऑर्डरबुक मजबूत

NBCC Share Price

NBCC Share Price | शेअर बाजारात गुरुवारी विक्रीचा दबाव असताना एनबीसीसी इंडिया या भारतातील आघाडीच्या पीएसयू इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 154 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 27690 रुपये आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 3.31 टक्के घसरणीसह 148.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एनबीसीसी लिमिटेड कंपनीने यापूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवर बॉर्डर फेंसिंग घालण्याचे काम केले होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारत-म्यानमार सीमेवर 1643 किलोमीटर लांबीचे बॉर्डर फेंसिंग घालण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एनबीसीसी इंडिया कंपनीला या कामाचा मजबूत फायदा होऊ शकतो.

मिझोराम राज्याच्या दंपा व्याघ्र प्रकल्पाला या बॉर्डर फेंसिंगमुळे अधिक सुरक्षा प्रदान होणार आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदी सरकार आपल्या देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी नेहमी कटिबद्ध राहिली आहे. आता भारत सरकार म्यानमार सोबतच्या सीमेवर 1643 किलोमीटर लांबीची बॉर्डर फेंसिंग घालून त्याला अधिक सुरक्षा प्रदान करणार आहे.

मजबूत सुरक्षेसाठी सीमेजवळ पेट्रोल ट्रॅकही देखील बनवले जाणार आहे. मणिपूर राज्यात म्यानमार सोबतच्या सीमेवर 10 किलोमीटर लांबीचे बॉर्डर फेंसिंग घालण्यात आले आहे. या परिसरात हायब्रीड सर्व्हिलन्स सिस्टिमद्वारे बॉर्डर फेंसिंगचे दोन प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर राज्यात 1 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यावर बॉर्डर फेंसिंग घालण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. यासह मणिपूर राज्यात 20 किलोमीटर लांबीच्या बॉर्डर फेंसिंग कामाला सरकारने मंजुरी दिली असून कामाची सुरुवात लवकरच केली जाईल.

बॉर्डर इन्फ्रा सुविधा प्रदान करण्याच्या बाबतीत एनबीसीसी इंडिया ही कंपनी भारतातील अग्रणी कंपनी मानली जाते. या कंपनीने भारत-पाक सीमेवर बॉर्डर फेंसिंगचे काम केले आहे. त्यात 61 किलोमीटर लांबीचे बॉर्डर फेंसिंग आणि गुजरातच्या कच्छ प्रदेशात 13 सीमा चौक्या बांधण्याचे काम कंपनीने केले होते.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारत-म्यानमार सीमेवर बॉर्डर फेंसिंग घालण्याचे काम एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळू शकते. त्यामुळे कंपनीला जबरदस्त फायदा होऊ शकतो. मिझोराम राज्यातील दंपा व्याघ्र प्रकल्पाजवळ बॉर्डर फेंसिंग घालण्याचे काम एनबीसीसी इंडिया कंपनी करणार आहे. याचे एकूण मुल्य 597 कोटी रुपये असेल. यासह ही कंपनी गुजरातमध्ये भारत पाक सीमेवर देखील बॉर्डर फेंसिंग घालण्याचे काम करणार आहे. या कामाचे एकूण मुल्य 763 कोटी रुपये असेल.

9 ऑगस्ट 2023 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 215 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील वर्षी 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 312 टक्के वाढला आहे. 27 मार्च 2020 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीने 16 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या किमतीवर ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 850 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE Live 10 February 2024.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x